BollywoodFlixHub

BollywoodFlixHub news

News

“तुझं टमरेलच वाजवतो”, मनोज जरांगे पाटलांचा संताप; म्हणाले,जातीवंत तरुणांनी…

जय महाराष्ट्र

  • सरकार म्हणतंय समिती अभ्यास करेल, जरांगे म्हणतात, आता अभ्यास नको थेट GR काढा, आमच्याकडे या, पुरावे घेऊन जा!

जालना :मराठा आरक्षणाची मागणी करत जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (६ सप्टेंबर) पत्रकार परिषद बोलावली. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय घेण्यासाठी वेगवेगळी कारणं देऊन सरकारने आणखी वेळ मागू नये. हा तिढा सोडवण्यासाठी हवे तितके पुरावे आम्ही तुम्हाला देतो, तसेच तज्ज्ञांचं पथकही देतो, डंपर भरून पुरावे पुरवले जातील. केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देता येतील इतके पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. हैदराबादपासून मुंबईपर्यंतचे पुरावे आम्ही गोळा केले आहेत. सगळे पुरावे सरकारला मिळतील. सरकारने केवळ याबाबत वटहुकूम काढण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जरांगे पाटलांना विचारलं की तुमचं हे आंदोलन एका विशिष्ट पक्षाच्या ध्येयधोरणाने सुरू असून तुम्ही केवळ सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताय असा आरोप काहींनी तुमच्यावर केला आहे. तुमच्या आंदोलनात राजकारण शिरलंय असं तुम्हाला वाटतंय का तुम्हाला. यावर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, जातीवंत तरुणांनी उभा केलेला हा लढा आहे, हे कुठल्या राजकारण्याचं आंदोलन नाही.

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अध्यादेश काढण्यासाठी चार दिवसांचा वेळ दिला होता. त्यापुढे पाऊल टाकून आज जरांगे पाटील यांनी नवी भूमिका जाहीर केली. सरकारने पुढचे तीन दिवस वाया घालवू नये. अध्यादेश काढण्यासाठी लागणारे सगळे कागदपत्रे आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. तसेच कायद्याच्या कचाट्यात आरक्षण अडकू नये यासाठी आम्ही तज्ज्ञही द्यायला तयार आहोत, पण आता सरकारला यापुढे वेळ वाढवून देणार नाही, अशी भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती केली.

मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. सुकलेलं तोंड, कोरडा पडलेला घसा आणि क्षीण झालेल्या आवाजातच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्य मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर जालन्या सुरू आंदोलनावर मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. मात्र अपेक्षित तोडगा निघाला नाही. यावर काम करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी समिती हैदराबादला जाईल, अशा स्वरूपाची चर्चा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला काही प्रस्ताव दिले.

राज्यपालांची परवानगी घेऊन सरकारने वटहुकूम काढावा

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “सरकारला चार दिवसांचा खूप मोठा वेळ दिला आहे. सरकारला आम्हाला वेठीस धरायचं नाही. अध्यादेश काढण्यासाठी जे कागदपत्रे हवेत, ते सरकारला आम्ही द्यायला तयार आहोत. राज्यपालांची परवानगी घेऊन सरकार वटहुकूम काढू शकतं. आता समितीने काम करायची आवश्यकता नाही. आम्ही न्यायालयात आरक्षण टिकविण्यासाठी तज्ज्ञही पाठवायला तयार आहोत, सरकारने आमच्यापाशी यावं आणि कागदपत्रे घेऊन यावं”

मराठा-ओबीसी समाजबांधव एकसाथ

सरकारने आता अधिक वेळ मागू नये. जर चार दिवसांची वेळ उलटून गेली तर मग नंतर आमच्या आंदोलनाची चूक नाही, सरकारला आवाहन करून सांगतो, सरकारने कुठीही जाऊ नये. हैदराबादला जाऊन समिती जे काम करणार आहे, तीच कागदपत्रे समितीला आम्ही द्यायला तयार आहोत. विधिमंडळाचं अधिवेशन नसल्याने राज्यपालांची परवानगी घेऊन सरकारने वटहुकूम काढावा. ओबीसी बांधवांनी गैरसमज करून घ्यायचं कारण नाही. आपण भाऊ-भाऊ आहोत. आतापर्यंत आपली ज्यांनी अडचण निर्माण केली, आपल्यात ज्यांनी भांडणं लावली, त्या राजकारण्यांना आपण धडा शिकवू, असंही जरांगे पाटील म्हणाले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *